शस्त्रक्रियेतील गुंतागुंत (COMPLICATIONS)
शस्त्रक्रिया हा आता आधुनिक उपचार पद्धतीतील अविभाज्य भाग झाला आहे .
शस्त्रक्रिया म्हटल्यावर रुग्ण , नातेवाईक , मित्रपरिवार , समाज हे सगळे चिंताग्रस्त होतात. हे सगळे चिंताग्रस्त का होतात तर त्यात असणारे धोके व त्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या कल्पनेमुळे . कल्पना करणे हे यासाठी महत्वाचे आहे कि ऐकलेल्या गोष्टींमुळे त्याचे वर्णन अतिशयोक्ती केले जाते व त्याच्या मुळापर्यंत न पोहचता चुकीच्या माहितीद्वारे त्याबद्दल बाऊ केला जातो.
काही आजारांमध्ये शस्त्रक्रिया हि आवश्यक असते. तर काही आजारांमध्ये औषधोपचार व शस्त्रक्रिया ह्या दोहांद्वारे फरक पडू शकतो. अशावेळी जर शस्त्रक्रिया केली गेली व त्यात काही गुंतागुंत झाली तर शस्त्रक्रियेला बदनाम केले जाऊन त्यात डॉक्टरांना दोषी धरले जाते .
परंतु अशावेळी असा विचार केला जात नाही कि सारासार विचार करून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला असेल.
शस्त्रक्रिया व गुंतागुंत हे एकदुसऱ्याशी जुळलेले नाते आहे . शस्त्रक्रिया हि केलीच यासाठी जाते कि शरीरात काहीतरी भानगड असून, त्या भानगडीला वठणीवर आणण्यासाठी शास्त्रक्रियांची मदत घेतली जाते.
शरीरातील भानगड जर सोपी व सरळ असेल तर शस्त्रक्रिया सुरळीत पार पडते . व जर ती वेडीवाकडी (COMPLEX)असेल तर शस्त्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात . कष्ट घेणे म्हणजे जड काम करणे नव्हे तर त्यासाठी असणारी तयारी, जोखीम, शारीरिक , मानसिक व आर्थिक नुकसान याचा विचार करून निर्णय घेणे.
गुंतागुंत होण्याचे प्रमुख करणे-
१) आजार
२) इतर आजार
३) रुग्ण
४) शिक्षण
५) शस्त्रक्रिया तज्ञ
६) रुग्णालय
१) आजार– ज्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे तो. त्यामध्ये काही आजार सोपे व काही कठीण आजार असतात व त्याप्रमाणे त्यांच्या जोखीम व परिणाम वेगवेगळे असतात. उदा : साधी गाठी व कर्करोगाची गाठ , साधे फॅक्चर व उघडे फॅक्चर .
२) इतर आजार – रुग्णाला असलेले इतर आजार त्यात मुख्यत्वे , हृद्य , फुफुस , किडनी , लिव्हर , रक्त , मेंदू , शरीराची रोग प्रतिकारशक्ती व इतर यांचा समावेश होतो. फक्त मधुमेह असला तरच शस्त्रक्रिया भानगड (गुंतागुंत ) होते असे असून इतर बाकीच्या आजारांमुळे सुद्धा (साधे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ) गुंतागुंत होते व त्याकडे सामान्य जनजीवन दुर्लक्ष करतात कारण त्याबद्दल त्यांना अज्ञान असते व ते डॉक्टर सुद्धा काही गुंतागुंत झाल्यानंतर शोधतात व त्यासंबंधी माहिती देतात. प्रत्येक इतर आजार शस्त्रक्रियेपूर्वी शोधणे शक्य नसते. व जे महत्वाचे आजार त्रास देऊ शकतात त्याबद्दल डॉक्टर तपासणीअंती माहित देऊ शकतात व त्याबद्दल खबरदारी घेऊ शकतात .
३) रुग्ण – प्रत्येक रुग्णाची शरीररचना , प्रकृती , मानसिक स्थिती , सामाजिक स्थिती , आर्थिक परिस्थिती व आजूबाजूची परिस्थिती (ENVIRONMENTAL) हि वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक रुग्ण औषधोपचाराला , भुलला, रक्तचढवणे, इम्प्लांट यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रतिसाद देतो. काही औषधी कितीही वर्ष रुग्ण घेत असला तरी त्याला काहीही दुष्परिणाम होत नाही. तर काही रुग्णांना तीच औषधी सुरवातीच्या पहिल्या डोसवेळी अपायकारक असते व त्यामुळे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो . हि सगळी भानगड / गुंतागुंत शस्त्रक्रियेपूर्वी / भूल देण्यापूर्वी किंवा औषधोपचारापूर्वी शोधता येईलच असे नाही.
तसेच काही रुग्ण आजाराच्या विचारांमुळे , दुसऱ्यांमुळे , NEUROGENICAL/ VASO VAGAL SHOCK मध्ये जातात. यामध्ये रक्तदाब एकदमच सुभ्याजवळ जातो व श्वासप्रकिया मंदावते व त्यातून रुग्णाला बाहेर काढणे म्हणजे जवळजवळ मृत्यूतून बाहेर काढण्यासारखे असते. कारण हे केव्हापण होऊ शकते म्हणजे रुग्णाला भरती करताना , शस्त्रक्रियेपूर्वी ,शस्त्रक्रियेची तयारी करताना व शस्त्रक्रियेनंतर सुद्धा. प्रत्येक वेळेला हे सगळे लक्षात येइलच असे नाही.
४)शिक्षण – रुग्ण व त्याचे नातेवाईक सुशिक्षित आहे किंवा नाही , तसेच त्यांना वैद्यकीय भाषा समजली अथवा नाही, तसेच डॉक्टरांची भाषा (बोलण्याची) त्यांच्या लक्षात आली अथवा नाही हे फार महत्वाचे असतात. जसे मराठीत नस म्हटली तर लोकांना फक्त रक्तवाहिनी लक्षात येते. परंतु शरीरामध्ये ज्या नसा असतात त्यात रक्तवाहिनी , मज्जातंतू , मा लपेशी(MUSCLE TENDON) असतात व त्यांचे प्रत्येकाचे कार्य वेगळे असते ते समजण्यामध्ये बराच वेळा चूक होते. तसेच रुग्ण / नातेवाईक दिलेली सूचना वाचतात किंवा नाही , संमतीपत्रक पूर्ण वाचून सही करतात किंवा नाही हे पण मह्रत्वाचे असतात.
संमतीपत्रकात बऱ्याचशा गोष्टी विषद केलेल्या असतात त्या जरी वाचल्या तरी रुग्णाला /नातेवाईकांना बरेच काही कळून त्याबद्दल डॉक्टरांना विचारून शस्त्रक्रिया व त्यामधील धोके यांची माहिती मिळू शकते व हे सर्व ठिकाणी सारखे असतात.
५) शस्त्रक्रिया तज्ञ – हे सगळयात महत्वाचे असून त्यांनी शिक्षण कोठे घेतले आहे, त्यांना किती अनुभव आहे, ते त्यांच्या क्षेत्रात अद्यावत राहतात किंवा नाही व ते किती काळजी घेतात हे सर्व महत्वाचे मानतात, काही शस्त्रक्रिया ह्या पहिल्यांदाच केल्या जातात जरी तज्ञ डॉक्टर अनुभवी असले तरी तसेच नवीन तंत्रज्ञानामुळॆ नवीन तंत्र हे पहिल्यांदा उपलब्ध करतात त्यात अडचणी येतात म्हणजे गुंतागुंत होऊ शकतो. कारण ज्यांनी हे तंत्र विकसित केलेले असते त्यांना सुद्धा ह्याचा सामना करावा लागतो व पुढे त्या गोष्टी सोप्या होत जातात. जेवढ्या गुंतागुंत माहिती असते व ते टाळण्यासाठी जे करणे शक्य असते ते शस्त्रक्रिया तज्ञ सगळ्याचा प्रयत्न करतो . तरी आधुनिकतेमुळे , काही वेळा शस्त्रक्रिया करतांना , जी साधनसामुग्री असते ती कां करणे बंद करते किंवा त्यात बिघाड येऊ शकतो. त्यावेळेला छोट्या शहरांमध्ये त्यांचे इंजिनियर उपलब्ध नसतात किंवा मिळत नाही, त्यामळे शस्त्रक्रियेमध्ये बदल करावा लागतो किंवा शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागते. तसेच काही वेळेला सांधेरोपण करतांना साईझ पूर्णपणे बरोबर होत नाही किंवा शस्त्रक्रिया करताना अघटित घडून येते ज्यामध्ये ठरलेला सांधा काढावा लागू शकतो व तो त्यावेळी उपलब्ध नसतो त्यावेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागते.
६) रुग्णालय – छोट्या / मोठ्या शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये बराच फरक असतो. त्यांची बरोबरी करणे शक्य नसते . कितीही आधुनिक गोष्टी उपलब्ध कराव्या लागतात तरी आर्थिक स्थितीमुळे ते शक्य नसते. काही मोठी धार्मिक रुग्णालये शस्त्रक्रिया कमी दरात करतात परंतु त्याचवेळेला त्याच शस्त्रक्रियेसाठी त्यांना जास्त दर देणारे रुग्ण उपलब्ध असतात व त्यामुळे त्यांना त्या गोष्टी करणे परवडते. छोट्या शहरांमध्ये हे करणे शक्य नसते. तसेच पेट्रामेडिकल स्टॉप हा मोठ्या शहरांमधे त्वरित उपलब्ध होतो. तो छोट्या शहरांमध्ये उपलब्ध नसते , तसेच सांगितलेल्या सर्व तपासण्या छोट्या शहरांमध्ये होतीलच असे नाही. व त्यामुळे वेगळा पैसा खर्च होतो व निदानापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो .
हा सर्व उठाठोप यासाठी आहे कि लोकांना, रुग्ण व नातेवाईक हे सगळे कळले पाहिजे कि शस्त्रक्रिया व गुंतागुंत यांचे संबंध काय आहेत व ते कशामुळे होतात व त्यात असणाऱ्या शस्त्रक्रिया तज्ञचा सहभाग किती असतो. तसेच प्रत्येक वेळी गुंतागुंत होण्यामध्ये शस्त्रक्रिया तज्ञ यांचा सहभाग असेलच असे नाही, त्यामुळे डॉक्टर व रुग्ण संबंध ताणले जाऊन रुग्णाला पुढे मिळणाऱ्या चांगला सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते. कारण डॉक्टर व रुग्णालये हे पुढे आपले कार्य चागंले चालू ठेवू शकतात जेव्हा रुग्ण व डॉक्टर यांच्यात संवाद असेल व ते ऐकमेकांना पूरक ठरतील. तसेच डॉक्टर हा प्रत्येक रुग्णाकडून चांगल्या गोष्टी शिकत असतो व प्रत्येक पुढच्या शस्त्रक्रियेत तो चांगले काम करतो व जी काही गुंतागुंत होऊ शकते ते न होऊ देण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आशा करू या कि आपले दोघांचे संबंध चांगले राहील तरच आपली दोघांची प्रगती होईल .